नाशिक – मुंबई आग्रा महामार्ग मंगळवारी सकाळी ९.३० वाजता वा जिंदाल कंपनी समोर स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला. नाशिक कडून मुंबईकडे जाणारी MH 14.CL.0016. या नंबरची स्विफ्ट डिझायर जात असतांना एक कामगार रोड क्रास करत असतांना समोर आला. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. जखमी कामागाराला घोटी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. इगतपुरी तालुक्यतील शेनवड येथील संजय विष्णू खोकल (४०) असे जखमी कामगाराचे नाव आहे.