नाशिक : शतपावली करीत असतांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यु झाला. हा अपघात जेलरोड भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राजू नानासाहेब पगारे (रा.हरिकृपा अपा.महालक्ष्मीनगर,दसक) असे दुचाकी अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पगारे शनिवारी (दि.१३) रात्री आपल्या परिसरात फेरफटका मारत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी तात्काळ अशोका मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास पोलीस नाईक भोळे करीत आहेत.