नाशिक – भरधाव चार चाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले. हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील ट्रक टर्मिनल भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक पांडुरंग खाडझोडे (वय १८) त्र्यंबक अजय पांडुरंग खाडझोड (वय २७,, चाखेचा पाडा) अशी मृतांची नावे आहेत. पीर बाबा मंदीराजवळ शनिवारी (दि.२३) साडे आठला हा अपघात झाला. ओझरकडून येणाऱ्या चार चाकीने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारा दरम्यान डॉ. राम पाटील यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलीस हवालदार राऊत यांच्या माहीतीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.