दुचाकी स्लीप झाल्यानंतर पाठीमागून आलेल्या डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यु
नाशिक – सिडकोत दुचाकी स्लीप झाल्यानंतर पाठीमागून आलेल्या डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यु झाला. काल बुधवारी (ता.१८) रात्री
सव्वा दहाच्या सुमारास सिडको परिसरातील नम्रता पेट्रोलपंपासमोर शंभो राजे पानटपरी समोर हा अपघात झाला. किरण निलेश पाटील
(वय २१, अवनी लॅण्ड मार्क, एकदंतनगर सिडको) असे युवतीचे नाव आहे. ही युवती काल रात्री सव्वा दहाच्या सुमारास तिच्या
ॲक्टीव्हा (एमएच १५ जीजी ९६१४) हिच्यावरुन तिच्या मैत्रीणीला भेटायला जात असतांना दुचाकी घसरली त्याच वेळी पाठीमागून
भरधाव येणाऱ्या टाटा डंपर ट्रक (एमएच ०६ बीडी ७८५५) याचे चाक युवतीच्या बरगडीवर गेल्याने तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी मृत
युवतीचे वडील नीलेश पंडीत पाटील (वय ४५, बुरकुलेनगर) यांच्या तक्रारीवरुन डंपर चालक सागर रामदास कदम (वय २८, आनंदनगर
पाथर्डी फाटा) यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक – आडगाव शिवारात चार चाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाले. मुंबई आग्रा महामार्गावर शनिवारी (ता.१४)
तीनला आडगाव शिवारातील जत्रा हॉटेल परिसरातील बीएसएनएल कार्यालयासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी श्रध्दा संदीप हिंगमिरे (वय २१, वसंत छाया अपार्टमेंट, इंदिरानगर) यांच्या तक्रारीवरुन (एमएच ४६ बीबी १८१२) या अशोक लेलॅड कंपनीच्या अज्ञात चालकाविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, तक्रारदार श्रध्दा हिंगमिरे याच्या जत्रा हॉटेल नांदुर लिंक रोडने त्यांच्या टीव्हीएस सेंन्ट्रा (एमएच १५ बीएफ ६६०९) हिच्यावरुन नांदूर नाक्याकडून जत्रा हॉटेलकडे जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अशोक लेलॅंड कंपनीच्या दोस्त (एमएच ४६ बीबी १८१२) हिने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वारासह त्यांचे वडील जखमी झाले.