नाशिक – मुंबई – आग्रा महामार्गावर गोंदे येथील प्रभु ढाब्याजवळ रोड क्रास करणा-या महिलेस धडक देऊन चालक वाहन घेऊन पसार झाला. या धडकेत महिलेला मुका मार लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील सुमनताई वंकर चव्हाणेके (५५) असे महिलेचे नाव आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणा-या अज्ञात वाहनाने ही धडक दिली. या अपघातानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेच्या तातडीने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.