पालघर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातील सर्वच भागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नदी नाल्यांना महापूर आल्याने जीवितहानी देखील झाली आहे. त्यातच मोठमोठे झाडे आणि विजेचे खांब देखील उन्मळून पडत आहेत. पालघर मध्ये विजेचा खांब कोसळून मोठी दुर्घटना खाली घडली आहे.
वादळी वाऱ्यामुळे पालघर शहरात विजेचा कमकुवत झालेला खांब थेड दुचाकीवर कोसळला आणि भीषण स्फोटही झाला. विद्युत वाहक तारांसह हा विजेचा खांब कोसळल्याने स्फोट होऊन आजूबाजूचा परिसरही हादरुन गेला. या दुचाकीचा चक्काचूर झाला, तर दुचाकीस्वार योगेश पागधरे हे गंभीररीत्या जखमी झाले. या भीषण स्फोटात दुचाकीस्वार तरुण काही फूट अंतरावर फेकला गेला. गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा वीज खांब कोसळल्याचे सांगितले जात आहे. योगेश पागधरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते कामावर जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीवर विजेचा खांब कोसळला होता. यात त्यांना जबर मार बसला होता. तर दुचाकीचाही चक्काचूक झाला होता. तारापूर एमआयडीसी येथील बोईसर-नवापूर रस्त्यावर कोलवडे नाका इथे हे घटना घडली. अचानक वीज खांब कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
https://twitter.com/ssidsawant/status/1556917808604520448?s=20&t=W0GK3JH3hH3gtembdG_TgQ
या दुर्दैवी घटनेत योगेश यांच्या झालेल्या मृत्यूमुळे पागधरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. योगेश हा टाटा स्टील या कंपनीत नोकरीला होते. ते कामावर जाण्यासाठी आपल्या दुचाकीवर निघाले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दरम्यान, वीज खांब कोसळल्यानंतर जखमी योगेश यांना वाचवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. रस्त्यावर अससलेल्या दुसऱ्या एका दुचाकी चालकानं योगेशला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही फसला आणि मदत करण्यासाठी पुढे आलेला तरुणही सुमारे 12 फूट लांब फेकला गेला.
दरम्यान, या अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज वितरण कंपनीचे कर्मचारीही दाखल झाले. जखमी योगेश पागधरे यांना रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची प्रकृत खालावत चालली होती. अखेर त्यांना मीरा रोड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. पण उपचादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कमकुवत झालेले विजेचे खांब आणि तारा तातडीने बदलण्यात यावेत अशी मागणी होत आहे.
Accident Electric Pole Collapse on Two Wheeler Blast Video
Palgar Dahanu Maharashtra Heavy Rainfall