मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातून रात्रीच्या वेळी दोघा चोरट्यांनी दुचाकी चोरुन ते कोर्ट रस्त्याने भरधाव वेगाने जात असतांना रस्त्यात उभ्या असलेल्या एका कारला जाऊन धडकले आणि दूर फेकले गेले. यात एकाला अधिक उपचारासाठी धुळे येथे नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर दुस-याला मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चोरट्यांच्या अपघाताचा हा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.