नाशिक – दुचाकीवरुन तोल जावून पडल्याने ६० वर्षीय चालकाचा मृत्यू
नाशिक : आडगाव शिवारातील दत्तमंदिर भागात दुचाकीवरुन तोल जावून पडल्याने ६० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. व्यंकट भागूजी गोडे (रा.देवळाली कॅम्प) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गोडे शुक्रवारी देवळाली कॅम्प येथून ओझरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. आडगाव येथील दत्त मंदिर भागात ते तोल जावून दुचाकीवरून पडले होते. या अपघातात त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने तात्काळ आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असा डॉ.श्रेया रंगा यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक अहिरे करीत आहेत.
मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
नाशिक : पेठरोडवरील राऊ हॉटेल भागात फोनवर बोलत उभ्या असलेल्या तरूणाच्या हातातील मोबाईल भामट्या दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण कैलास सुर्यवंशी (२२ रा.राजेश्वरी सोसा.गुलमोहरनगर,दिंडोरीरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सुर्यवंशी गुरूवारी रात्री पेठरोडवरील राऊ हॉटेल भागात गेला होता. एका पानटपरी समोर तो फोनवर बोलत उभा असतांना ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभा राहून तो बोलत असतांना पाठीमागून ट्रिपलसिट आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्या हातातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.