नाशिक : नाशिक – पुणे महामार्गावरील आयनॉक्स सिग्नल जवळ भरधाव मालट्रकने धडक दिल्याने ८९ वर्षीय वृध्द महिला ठार झाली.गंगू गणेश कुलकर्णी (८९ रा.दिपनगर सोसा.शिवीजानगर) हे मृत महिलेचे नाव आहे. या अपघाताची उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून परप्रांतीय ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. मजहर नवाब अली खान (३४ रा.उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या मालट्रक चालकाचे नाव आहे. या अपघातानंतर रत्नाकर कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे. गंगू कुलकर्णी या बुधवारी दुपारी आयकॉन्स सिग्नल परिसरातील एसबीआय बँकेत गेल्या होत्या. बँकेतील काम आटोपून त्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला होता. रामदास स्वामी मार्गाने त्या पायी जात असतांना पाठीमागून भरधाव येणा-या एमएच १२ एलटी ५९२३ या मालट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.