नाशिक : महामार्गावरील भरकादेवी आईस्क्रिम दुकानाजवळ दुचाकी अपघातात ओझर येथील ३५ वर्षीय तरूण ठार झाल्याची घटना घडली आहे. दिपक मुकूंद केदारे (रा.सिध्दार्थ नगर,ओझर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. केदारे बुधवारी कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास ते नाशिक कडून ओझरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. शरयू पार्क भागातील भरकादेवी आईस्क्रिम परिसरात त्याच्या दुचाकीस अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. बोरा यांनी मृत घोषीत केले. रामदास जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.