नाशिक : नाशिक पुणे मार्गावरील उड्डाणपुलावर दुचाकी अपघातात गंभीर झालेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. राजेंद्र जोधर लिल्लारे (रा.नाशिककर मळा,रेल्वे लाईन गोरेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. लिल्लारे रविवारी नाशिक पुणे मार्गावरील उड्डाणपुलावरून दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. ब्रिज उतरत असतांना त्याच्या दुचाकीस अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने पोलीसांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता रात्री उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक घेगडमल करीत आहेत.