नाशिक – नांदुरी जवळ ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहाणी झालेली नाही. शनिवारी घोटीजवळ अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर हा दुसरा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावर सध्या देवीची चैत्र यात्रा सुरू असल्यामुळे पोलिसांची ही गाडी कर्मचा-यांना घेऊन गडावर गेली होती. गडावरून खाली आल्यावर गाडीची पुढची चाके निखळल्यामुळे हा अपघात झाला. ग्रामीण पोलिसांच्या गाड्यांबाबत होणारे हे अपघात चिंतेचा विषय आहे. या गाड्या किती जुन्या आहे. त्यांची देखभाल व्यवस्थिती होते का ? यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे.