मुंबई – मांटुगा स्थानकावर जवळ रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. एक्सप्रेसचे तीन डब्बे घसरले आहे. गदग व पद्दुचेरी या दोन रेल्वे समोसमोर आल्या आहे. या अपघातात कोणतीही जिवितहाणी झालेली नाही. एका पाठोपाठ गाड्या आल्यामुळे हा अपघात झाले आहे. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जनसंपर्क अधिकारी सदाशिव सुतार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वीच रेल्वेचा एलटीटी मुंबई-जयनगर एक्स्प्रेसचे ११ डबे देवळाली कॅम्प – लहवित रेल्वे स्टेशनच्या मध्ये घसरुन भीषण अपघात झाला होता. त्यानंतर त्यानंतर रेल्वे प्रशासानाने काम सुरु करुन जवळपास डाऊन लाईन सुरक्षित केल्या होत्या. त्यानंतर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
https://twitter.com/ShivajiIRTS/status/1515020236122202118?s=20&t=8gxGDKqNKM8M0zkP6UxLKg