नाशिक – दुचाकी घसरुन एकाचा मृत्यु झाल्याची घटना मोहाडी वरवंडी रस्त्यावर झाली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शंकरराव लहु सुर्यवंशी (वय ५७, अमृतमय सोसायटी, मेहेऱधाम पेठ रोड) असे अपघातात मृत्यु मुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मृत शंकरराव सुर्यवंशी हे त्यांच्या दुचाकी हिरो स्प्लेंडर हिच्यावरुन वरवंडी रोडने म्हसरुळ कडे येत असतांना म्हसरुळ शिवारात डगळे वस्तीवर त्यांची दुचाकी घसरल्याने झाडावर आदळली त्यात त्यांचा मृत्यु झाला तर पुतन्या रुषी गंभीर जखमी झाला.