नाशिक : दोन दुचाकींमध्ये समोरा समोर झालेल्या अपघातात एक चालक ठार झाला. हा अपघात चेतनानगर ते पाथर्डी फाटा या मार्गावर झाला. याप्रकरणी विरूध्द दिशेने प्रवास करणा-या जखमी दुचाकीस्वाराविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश हरिश्चंद्र पवार (३५ रा.कृष्ण मंदिरासमोर आव्हाड चौक,चेतनानगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पवार गुरूवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने एमएच १५ ईजे ००७९ पाथर्डी फाटा येथे जात असतांना हा अपघात झाला. कर्मा हाईटस या इमारतीसमोरून ते प्रवास करीत असतांना विरूध्द दिशेने भरधाव येणाºया एमएच १५ जीपी ९२९६ या दुचाकीने पवार यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात पवार यांच्यासह विरूध्द दिशेने दुचाकीवर प्रवास करणारा महादेव पटेल हे जखमी झाले. दोघांनाही रूग्णालयात दाखल केले असता पवार यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. याप्रकरणी मैना पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून महादेव पटेल या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.