नाशिक – द्वारका ते ओझर दरम्यान उड्डाणपूलावर चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यु
नाशिक – चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यु झाला. द्वारका ते ओझर दरम्यान उड्डाणपूलावर हा अपघात झाला. शरद मुरलीधर ठाकूर (वय ४२, कृष्ण लिला सोसायटी, अंबड लिंक रोड पवननगर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहीती अशी उड्डाणपूलावर शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास शरद ठाकूर हे त्यांच्या दुचाकी पल्सर (एमएच १५ बीपी ७६२२) हिच्यावरुन द्वारका सर्कल येथून जात असतांना मुंबईकडून ओझरच्या दिशेने चाललेल्या वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नाशिकला धाडीवाल हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता, डॉ. सागर मोरे यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सुनील मुरलीधर ठाकूर यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक – नांदूर नाका परिसरात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यु
नाशिक – वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद मार्गावर नांदूर नाका परिसरात हा अपघात झाला. प्रभाकर दगडू सोनारे (वय ८४, कानिफनाथ हौंसीग सोसायटी, औरंगाबाद रोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांचे नाव आहे.गेल्या बुधवारी प्रभाकर सोनारे हे सायकलवरुन नांदूर नाका भागातून जात असतांना हा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. तुळजा भवानी वाहन बाजाराकडून येणाऱ्या पाठीमागून मिर्ची हॉटेलकडून भरधाव येणाऱ्या वाहनाने ही जोरदार धडक दिली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.