मधूर गुजराथी चांदवड
निंबाळे येथे कुत्रे आडवे गेल्याने दुचाकी चालकांचा अपघातात मृत्यू
चांदवड– तालुक्यातील निबांळे येथे कुत्रे आडके गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मधुकर लक्ष्मण संसारे हे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते दुचाकीने निंबाळे गावात शाळेतील मुलांना आणण्यासाठी जात असतांना चौफुलीवरुन कुत्रे आडवे गेले. या जोरदार धडकेमुळे मधुकर संसारे जागीच ठार झाले. भारत मधुकर संसारे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलीसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरीचंद्र पालवी हे करीत आहेत.

……..
आयशर ट्रकची दुचाकीला धडक दोन जण जखमी
चांदवड – आयशर ट्रकची दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहे. मुंबई आग्रारोडवर चंद्रेश्वर व देवीचे पायथ्याचे पुढे सर्वीस रोडलगत पाण्याचे टाकीजवळ हा अपघात झाला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अशोक लेलॅड कंपनीचा आयशर ट्रकच्या अज्ञात चालकाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. यात प्रकाश वाघ व त्यांचे मागे बसलेले अमोल सुकदेव वाघ हे दोघे जखमी झाले. आयशर चालक अपघाताची खबर न देता पळून गेला अशी फिर्याद प्रकाश वाघ यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. या अपघाताची चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.