नाशिक : त्र्यंबकरोडनाका भागातील राजदूत हॉटेल परिसरात दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना तोल जावून पडल्याने एकाचा मृत्यु झाला.याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिरूद्द अनिल पाठक (४५ रा.अंबर सोसा.श्रीरामनगर पंचवटी) असे दुचाकीवरून पडल्याने मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाठक गेल्या ५ जानेवारी रोजी मित्र समीर वडुलेकर (रा.कामटवाडे) यांच्या अॅक्टीव्हावर एमएच १५ डीएफ ००६४ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. जिल्हारूग्णालयासमोरून प्रवास करीत असतांना चालकाचा तोल गेल्याने दोघे मित्र जखमी झाले होते. त्यातील पाठक यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक काकवीपुरे करीत आहेत.