मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रारोडवर खडकजांब गावाजवळ हुंदाई कारच्या धडकेने ४८ वर्षीय महिला ठार झाली. चांदवड ते नाशिक ट्रॅकवर चाणक्य किराणा दुकानासमोर दुभाजकावर २९ जानेवारी रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास मंगला साहेबराव गांगुर्डे ( ४८) रा. खडकजांब या पिंपळगाव ते चांदवड रस्ता ओलांडण्याच्या बेतात असतांना दुभाजकावर उभ्या होत्या. याचवेळी चांदवडकडून येणारी हुंदाई १० गाडी क्रमांक एम.एच.१५/ डी.एस. १३७ याच्यावरील चालकाने अविचाराने हयगईने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवून जात असतांना गाडी दुभाजकावर चढवून मंगला साहेबराव गांगुर्डे या गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची खबर त्यांचा मुलगा सुभाष साहेबराव गांगुर्डे रा. खडकजांब याने वडनेरभैरव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पोलीसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही. एन.घुमरे हे करीत आहेत.