नाशिक – जेल रोडला दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक अनिलसिंग मेहताबसिंग परदेशी (वय ७२, विशाल बंगला डिसुझा रोड जेल रोड) यांचा मृत्यू झाला आहे. परदेशी रविवारी सायंकाळी घरी जात असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी जयराम हॉस्पीटल व त्यानंतर नाशिकला सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉ. नगावकर यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली