नाशिक – रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यु; नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद
नाशिक – रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. महेश राजेश कातकाडे (वय २२, मॉडेल कॉलनी जेल रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. मध्य रेल्वेच्या किलोमीटर क्रमांक १९-२२ दरम्यान डाऊन मार्गावर रविवार सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक अशोक कुमार यादव यांच्या तक्रारीवरुन नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक – सातपूरला स्वारबाबानगरला एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उमेश रामदास गवई (वय ४१, जय भीमचौक स्वारबाबानगर सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. काल राहत्या घरी दीडच्या सुमारास राहत्या घऱी आढ्याला साडीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पाटील यांनी मृत घोषीत केले. सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.