नाशिक – दुभाजकावर मारुती कार आदळून चालकाचा मृत्यु झाला. विनयनगर पोलिस चौकीसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. दर्शन मोतीलाल जैन (वय २१, अभिषेक अर्पाटमेंट, विनयनगर) असे मृत चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मृत हा त्याच्या ताब्यातील मारुती झोन (एमएच ०२ बीडी ४६०७) हिने विनयनगरहून इंदिरानगरच्या दिशेने जात असतांना भरधाव चारचाकी विनयनगर पोलिस चौकीसमोर रस्ता दुभाजकावर त्यानंतर पथदिपावर आदळली त्यात, चालकाच्या पोटाला गंभीर मार मारुन त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत तपास करीत आहेत.