नाशिकरोड – दत्त मंदिर सिग्नलवर एका दूध टँकर व दुचाकीचा भिषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार विनायक गणपत नागरे (४८) राहणार चाडेगाव कोटमगाव नाशिक हे जागीच ठार झाले.
सिन्नर फाट्याकडून द्वारकाकडे जाणारा दूध टँकर क्रमांक जी जे १९ एक्स १८९९ आणि दत्त मंदिर कडे जाणार्या स्प्लेंडर गाडी क्र एम एच १५ बी ०९५२ मध्ये हा अपघात झाला आहे.
अपघातस्थळी उपनगर पोलिस ठाणे अंकीत बिटको पोलिस चौकिचे सहायक पोलिस निरीक्षक मन्नवर सिंग परदेशी त्यांचे सहकारी भोर आणि नाशिकरोड वाहतुक शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने मृतदेह रुग्णालयात रवाना केला. या अपघातामुळे वाहतुक कोंडी झाली होती. पण, पोलिसांनी ती सुरळीत केली. दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर बघ्यांची दत्त मंदिर सिग्नलवर गर्दी झाली होती.