नाशिक : गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकात भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने २८ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला आहे. मॅरेथॉन चौकात भरधाव वेगातील वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला .याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आदर्श दास (२८ रा.गार्डन व्हीव अपा.विनयनगर) असे दुचाकी अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. आदर्श दास हा गुरूवारी गंगापूरनाक्याकडून अशोकस्तंभाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ एफजी ९६२५ भरधाव वेगात प्रवास करत होता. या अपघातात दास गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. या अपघातात दुचाकीचाही चक्काचूर झाला असून याप्रकरणी पोलीस नाईक शांताराम महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.