नाशिक – ट्रक्टर चालवितांना तो पलटी होऊन चालकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी साडे पाचच्या सुमारास मखमलाबादला काकड मळा भागात घडली. संदीप भिकम शेखरे (वय ३०, कोकणगाव, ता. दिंडोरी) असे मृत चालकाचे नाव असून त्यांचा ट्रॅक्ट्रर खाली दबून त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली. मृत संदीप हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा मखमलाबाद येथील काकड मळा शिवारातील शेतालगतच्या रस्त्याने जात असतांना हा अपघात झाला. ते फोन आल्याने फोनवर बोलतांना त्यांचे ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रक्टर शेतालगतच्या नाल्यात ट्रक्टर पलटी झाला.