नाशिक – दुचाकीला धडकेत विश्वनाथ देवराम शिंदे (वय ५७) यांच्या मृत्यू झाल्यामुळे म्हसरुळ पोलिस ठाण्यात महिला दुचाकीस्वार विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅक्टीव्हावरुन ही महिला मुलगी व सायकल घेऊन जातांना हा अपघात झाला. याप्रकरणी संजय विश्वनाथ शिंदे यांच्या यांनी तक्रार दाखल केली आहे. रासबिहारी लिंक रोड वर औंदुबर लॉन्स परिसरातून ॲक्टीव्हा मोपेड सायकल (एमएच १५ एचजे २३३) ही महिला चार जानेवारीला त्यांच्या ॲक्टीवावर जात होती. या भरधाव दुचाकीने मेरी कडे जातांना विश्वनाथ देवराम शिंदे (वय ५७) यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात, विश्वनाथ शिंदे जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.