नाशिक : भरधाव अज्ञात चारचाकीने धडकेत दुचाकीस्वार दांम्पत्यापैकी पती ठार झाला. या अपघातात पत्नी जखमी झाल्या असून हा अपघात केवडीबन भागात झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. वैभव पाठक (५० रा.एरिकेशन कॉलनी,टागोरनगर ना.रोड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री पाठक यांनी तक्रार दाखल केली आहे. पाठक दांम्पत्य मंगळवारी (दि.१४) केवडीबनातून तपोवन रोडने आपल्या ज्युपीटर एमएच १५ जीएच २६०९ या दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. टोगोरनगरच्या दिशेने दांम्पत्य प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघे पती पत्नी जखमी झाले होते. त्यातील पतीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.