नाशिक – पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने त्यात एकाचा मृत्यू
नाशिक – पंचवटी परिसरात मिनाताई ठाकरे स्टेडीयम परिसरात पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला. बबन भरीत (वय ३७, आंबे बहुला विल्होळी) असे अपघातात मृत्यु झालेल्या मृताचे नाव आहे.याप्रकरणी रामसिंग जयबहादूर ठाकूर (वय ४९, संकेत अपार्टमेंट कामठवाडा) याच्या तक्रारीवरुन पिकअप चालकाविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – रामसिंग ठाकूर आणि मृत बन्सी भरीत हे दोघे त्यांच्या दुचाकी (एमएच १५ बीएल ६९४८) हिच्यावरुन जात असतांना गुरुवारी (ता.९) साडे सातच्या सुमारास ठाकरे स्टेडीयम परिसरात स्वामी टाईल्स समोर पाठीमागून आलेल्या पिक अप (एमएच १५ डीके ५७२५) धडक दिल्याने बबनच्या डोक्याला गंभीर जखम झाली उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एम. डी.पाटील तपास करीत आहेत.
नाशिक – एरंडवाडी परिसरात किरकोळ कारणावरुन रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार
नाशिक – पंचवटीत पेठ रोड भागात एरंडवाडी परिसरात किरकोळ कारणावरुन सराईताने रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार केले. प्रवीण उर्फ बादल पवन वाघ (एरंडवाडी, पेठ रोड पंचवटी) असे सराईताचे नाव आहे. त्याच्यावर पंचवटी ठाण्यात यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारात तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेली माहीती अशी रिक्षाचालक विक्रम रमेश थोरात (वय २९, एरंडवाडी) हे बुधवारी (ता.८) रात्री सव्वा नउच्या सुमारास तेथील पिंपळाच्या झाडाजवळ त्यांच्या मित्राशी बोलत असतांना सराईत प्रवीण वाघ याने मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत लाथा बुक्याने मारहाण केली तसेच मी येथील भाई आहे माज्या नादाला लागायचे नाही असा दम देत धारदार शस्त्राने नाकावर, डोक्यावर गालावर वार केले. उप निरीक्षक पी.ए.नेमाणे तपास करीत आहेत.