नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर चारचाकीच्या धडकेत पादचारी ठार; आठवड्यातील तिसरी घटना
नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर शेर ए पंजाब ढाब्यासमोर काल मध्यरात्री पाउनच्या सुमारास चारचाकीच्या धडकेत पादचारी ठार झाला. या आठवड्यातील हा तिसरा मृत्यु आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अरुण नामदेव पाटील यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी बुधवारी मध्यरात्री पाउनच्या सुमारास अज्ञात चाळीस ते पन्नास वयाचा पादचारी रस्ता ओलांडत असतांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख पटलेली नाही.
फूलबाजारात दोघांनी केली एकाला बेदम मारहाण
नाशिक – पंचवटीतील गणेशवाडी भागातील फूलबाजारात दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिवाजी सुरेश घाटबळे (वय २६, कन्नड, जि.औरंगाबाद) यांच्या तक्रारीवरुन शंकर नवनाथ पांडे मरीमाता झोपडपट्टी, संदीप प्रकाश खंदारे वृदांवननगर जत्रा हॉटेल जवळ यांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी तक्रारदार शिवाजी हा भाजीपाला खरेदीसाठी आले असा, संशयितांनी रागाने काय पहातो असे म्हणत धक्का देउन त्याला जमीनीवर पाडून लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच संदीप खंदारे याने गालावर ब्लेडने वार केला याप्रकरणी पंचवटी पोलिसात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.