नाशिक – मुंबई – आग्रा महामार्गावर गुरुवारी रात्री ८.३० वा वाडिव-हे फाट्यावर अज्ञाक वाहनाने मोटर सायकलला धडक दिल्यामुळे धुळे येथील हर्षद ललित चौधरी ( २९) हे गंभीर जखमी झाले. मोटर सायकल क्रमांक Mh 19.CB.6651 यावरुन चौधरी नाशिक येथून मुंबई कडे जात असतांना वाडिव-हे फाट्यावर हा अपघात झाला. एक अज्ञात वाहन रोड क्रांस करत असतांना ही घटना घडली. हा अज्ञात वाहन धारक जोरदार धडक दिल्यानंतर पसार झाला. या अपघातात चौधरी यांच्या डोक्यास गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली व पेशंटला वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.