नाशिक : भरधाव डंम्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दांम्पत्य ठार झाले. हा अपघात औरंगाबादरोडवरील शिलापूर नजीक झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. कानिफनाथ श्रावण पगार (५०) व सुनिता कानिफनाथ पगार (४७ रा.दोघे सोमठाण देश ता.येवला) असे अपघातात ठार झालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. पगार दांम्पत्य सोमवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास नाशिककडून निफाडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. शिलापूर येथील श्रीसाई सरस्वती पेट्रोल पंपा समोर रॉंग साईडने भरधाव आलेल्या हायवा डंम्परने दुचाकीस धडक दिली. या अपघातात पगार दांम्पत्य गंभीर जखमी झाले होते. नातेवाईक तुषार शिंदे (रा.देशमाने) यांनी त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी दोघांना मृत घोषीत केले.