सिन्नर – सिन्नर महामार्गावर खोपडी शिवारात मोटरसायकल आणि स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल (दि.१७) रात्री साडे सातच्या च्या सुमारास घडली.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,शंकर निवृत्ती वाजे (५१) आणि सुभाष बारकु माळी रा. डूबेर ता.सिन्नर हे वावीहून सिन्नरकडे मोटरसायलवर सिन्नरकडे जात असताना खोपडी शिवारात हॉटेल रिच समोर भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने (क्र.एम.एच.-०४ डी वाय ५५८३) मोटारसायकल ला जोराची धडक दिली.
या अपघातात मोटासायकलस्वार हे गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपुर्वीच शंकर वाजे यांची प्राणज्योत मालवली तर सुभाष माळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वावी पोलिस ठाण्यात या बाबत अपघाताची नोंद झाली असून शुक्रवार( दि१८) रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत कारचालका विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास पोलिस हवालदार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.