नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली. हा अपघात त्र्यंबकरोडवरील संस्कृती हॉटेल समोर झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दीक्षा अनुराग शेळके (४० रा.बीएसएनएल कार्यालयासमोर त्र्यंबकेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. दीक्षा शेळके या सोमवारी (दि.८) कामानिमित्त शहरात आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास त्या आपल्या दुचाकीवर त्र्यंबकच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. संस्कृती हॉटेल समोर अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. अतुल काळे यांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.