नाशिक – नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर राजुरी पाटी जवळ दोन मोटर सायकल अपघातात दोन जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले. रविवारी सायंकाळी ७ वाजता हा अपघात झाला. नाशिककडून मुंबई कडे जाणारी मोटार सायकल क्रमांक MH. 01.5001 व विरूद्ध दिशेने येणारी मोटर सायकल क्रमांक MH. 15.सी यु.1497 या समोरा समोर जोरदार धडकल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहीती मिळताच गोंदे फाटा येथे अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत आसलेली जगदगुरु नरेद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना नाशिक जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
जखमी झालेल्या नावे ही आहे.
– विपुल महेंद्र सिगगाडिया वय ३३
– तुषार रॉय वय ३० रा मुंबई प्रभादेवी*
– अजय संपत सुपे वय १७
– गुलाब व्यंकटेश बांगर वय २१
– राहुल तुकाराम बांगर १४
रा आंबेबहुला ता जि नाशिक