नाशिक – नाशिक – औरंगाबाद महामार्गावर ३ ऑक्टोबरला वाहनाच्या धडेकत गंभीर जखमी असलेल्या महिलेचा काल मृत्यु झाला. मैहरदेवी सतेंद्र रॉय (वय ३६, माडसांगवी ता.नाशिक) असे अपघातात ठार झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सतेंद्र लालचंद्र रॉय (वय ३८, माडसांगवी) यांच्या तक्रारी वरुन आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी औरंगाबाद महामार्गावर माडसांगवी शिवारात ३ नोव्हेंबरला पावणे सातच्या सुमारास मृत मेहेरदेवी माडसांगवी बस थांब्याजवळ रस्ता ओलांडत असतांना नाशिकहून भरधाव येणाऱ्या पांढऱ्या स्कार्पिओ चार चाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचे काल निधन झाले. अपघात करुन महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व त्यानंतर खबर न देता पळून गेलेल्या अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.