ट्रकच्या धडकेत आंबेडकरनगरला दुचाकीस्वार ठार
नाशिक – नाशिक पुणे महामार्गावर शनिवारी सकाळी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी अमोल शिवाजी बोराडे याच्यातक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झालाआहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी सकाळी सव्वा दहाच्यासुमारास आंबेडकर नगर परिसरात ट्रक (एमएच १५ जी १७५१) हिच्यावरील चालकाने भरधाव ट्रक चालवित सम्राट सिग्नल परिसरात दुचाकी(एमएच १५ जीडी ८१२३) हिला धडक दिल्याने त्यावरील चालक समाधान
शिवाजी बोराडे ( (छत्रपती शाहूनगर ) याचा मृत्यू झाला.शनिवारी सकाळी झालेल्या अपघाताने काही काळवाहातूक ठप्प झाली होती. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पजेरोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक – मायको सर्कल परिसरात पजेरोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. सुधाकर जाधव पाथर्डी फाटा ) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की,सुधाकर जाधव हे १८ सप्टेंबरला त्यांच्या दुचाकी (एमएच १५ एई ७१४३) हिच्या हुन जात असतांना पाठीमागून आलेल्या पजेरो (एमएच १५ बीएक्स ५८५८) हिने पाठीमागून धडक दिल्याने सुधाकर जाधव जखमी झाले. मायको सर्कल परिसरात निलेश ड्रायफूट दुकानाजवळ हा अपघात घडला. यात सुधाकर जाधव जखमी झाले त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करणअयात आला आहे.