नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर ज्युपीटर हॉटेल समोर उड्डाणपूलावर ट्रकच्या एयर बोल्ट दुरुस्ती करतांना पाठीमागून आलेल्या कंटनेरने धडक दिल्याने दुरुस्तीचे काम करणारा चालक ठार झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख गालीब शेख इब्राहीम असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख रशीद शेख मुबारक (वय ५६, गाझीप्लाट हिवरखेड रोड, अकोट (जि.अकोला) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात कंटेनर (एमएच ०४ ईएफ ८८०९) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी बुधवारी (दि. २०) रात्री नाशिककडून मुंबईला चाललेल्या ट्रक (एमएच १२ एचडी ६९४८) ची वायर तुटल्याने गाडी एयर घेत नसल्याने स्पीड घेत नव्हती त्यामुळे ट्रक चालक मृत शेख गालीब शेख इब्राहीम हा खाली उतरुन ट्रकच्या बोल्ट उघडत असतांना पाठीमागून आलेल्या कंटनेर (एमएच ०४ ईएफ ८८०९) याने ट्रकला धडक दिल्याने ट्रकच्या बोल्ट उघडत असलेल्या चालकाच्या अंगावरुन ट्रक जाउन त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.