नाशिक : धावत्या दुचाकीवरून पडल्याने ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीत झाला होता. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. महेश कारभारी शिंदे (रा.श्रमिकनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिंदे सोमवारी (दि.११) अंबड एमआयडीसीतून श्रमिक नगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक धावत्या दुचाकीवरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तातडीने मुंबईनाका येथील सीएनएस हॉस्पिटल येथे दाखल केले असता सायंकाळी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.