भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात नाशिकरोड येथील दत्तमंदिररोड भागात झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नंदकुमार रामकृष्ण दहिवाळ (४९ रा.ढिकले मळा,कॅनलरोड पंचक शिवार) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दहीवाळ बुधवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास स्प्लेंडर एमएच १५ जीवाय ४०७६ या दुचाकीने दत्तमंदिर रोडने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. आर्चिस गॅलरी समोर पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १३ सीयू २८६२ या मालट्रकने दुचाकीस धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दहिवाळ यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी त्यांचे बंधू बाबासाहेब दहिवाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक कुबेर ज्ञानदेव कुटे (रा.बारशी जि.सोलापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.
४५ हजाराचे बांधकाम साहित्य चोरीला
नाशिक : नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी कॉलममध्ये टाकण्यात येणा-या लोखंडी रिंग आणि स्टील कटींग मशिन असा सुमारा ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अली जनामुद्दीन सिध्दीकी (रा.टाकळी रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सिध्दीकी कोनार्क नगर येथील हायलॅण्ड प्राईड नावाच्या बांधकाम सुरू असलेल्या साईटवर कामकाज पाहतात. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.६) दुपारच्या सुमारास साईडच्या आवारात पडलेल्या कॉलममध्ये टाकण्यात येणा-या लोखंडी रिंग आणि शेजारी पडलेले स्टील कटींग मशिन असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.
……