नाशिक : काठे गल्ली आणि मुंबईनाका भागात झालेल्या वेगवेगळया अपघातात दोन जण जखमी झाले. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून पोलीस वाहनास दिलेल्या धडकेत तो जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काठेगल्लीतील मुकेश भाई पटेल यांच्या फरशीच्या गोडावून समोर उभ्या असलेल्या सीआर मोबाईल एमएच १५ एबी ०१६२ या पोलीस वाहनास भरधाव अॅक्टीव्हाने एमएच १५ एचएल ०७७४ धडक दिली. हा अपघात रविवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास झाला. या अपघातात १७ वर्षीय मुलगा जखमी झाला असून वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीसह पोलीस वाहनाचे नुकसान झाले असून, सहाय्यक उपनिरीक्षक निसार शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात मुंबईनाका भागातील शिंदे हॉस्पीटल नजीक झाला. मतीन खलील शेख (रा.योगीराज अपा.वोक्हार्ट हॉस्पिटल समोर) हा युवक जखमी झाला. वडाळानाका कडून मुंबईनाक्याच्या दिशेने भरधाव येणाºया मारूती कारने (एमएच ४३ एन ७४९३) पुढे जाणा-या दुचाकीस एमएच १५ एफके ८७६७ धडक दिली. या अपघातात मतीन शेख जखमी झाला असून कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी जमील शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुह्यांचा तपास हवालदार भिल करीत आहे.