हनुमानवाडीत कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यु; महिलेविरोधात गुन्हा दाखल
नाशिक – पंचवटीतील हनुमानवाडीत कारच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यु झाला. बाळु रंगनाथ गांगुर्डे असे कारच्या धडकेत मृत झालेल्या जेष्ठांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरुन एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी पंचवटीतील हनुमानवाडी परिसरातील भाग्यसिध्दी हाईटस समोरील टी पॉईट परिसरात मंगळवारी (ता.७) साडे अकराच्या सुमारास बाळु रंगनाथ गांगुर्डे (वय ६०) हे रस्त्याने पायी चालले असतांना पांढऱ्या रंगाया भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी श्वेता प्रमोद गायकवाड या महिलेविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे तपास करीत आहेत.
कानडे मारुती लेन परिसरात कारमधून ४० हजाराचा ऐवज लंपास
नाशिक – कानडे मारुती लेन परिसरात कारमधील लॅपटॉपसह रोख रकमेसह चाळीस हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी किशोर अशोक मांदळे (वय ३५, मधुबन कॉलनी, राधा पॅलेस जवळ) यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी फिर्यादी किशोर मांदळे यांनी काल शनिवारी (ता.११) सकाळी दहाला त्यांची स्विफ्ट चार चाकी (एमएच ०३ सीएच ४०९० ) कानडे मारुती लेन येथील राजरतन टेलरिंग मटेरियल दुकानासमोर पार्क केली असता चोरट्याने कारचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून कारच्या सीटवरील डेल कंपनीचा लॅपटॉप, ५ हजाराची रोकड, पॅन,आधार कार्ड आणि स्टेंट बॅकचे पासबुक, चेक बुक असा सगळा ऐवज चोरुन नेला.