इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चांदवड जवळील मुंबई – आग्रा महामार्गावरील राहुड घाटात काल रात्री गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु झाली आहे. या अपघातामुळे राहुड घाट बंद असल्याने वाहतूक मनमाड मार्गे वळवण्यात आली असून वाहतुकीची कोंडी झाली आहे.
या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात गॅस टँकर(बुलेट टँकर)चा काल रात्री अपघात झाला. त्यानंतर गॅस गळतीमुळे महामार्गावरील मालेगावकडे जाणारी वाहतूक मनमाड मार्गे मलेगावकडे वळवण्यात आली. चांदवड कडून येणारी वाहतूक आणि पुणे-इंदोर मार्गावरून रोजची होणारी वाहतूक यामुळे मनमाडच्या मालेगाव चौफुलीवर वाहनांची कोंडी झाली आहे,
त्याप्रमाणे घाटातील वाहतूक बंद असल्याने चांदवड येथे कॉलेजला जाणाऱ्या तसेच मालेगाव येथून जाणारे शासकीय कर्मचारी यांचे मोठे हाल झाले आहे. दरम्यान गॅस गळती होत असलेल्या बुलेट टँकर मधून अन्य दुसऱ्या टँकर मध्ये गॅस भरला जात असला तरी या महामार्ग वरील वाहतूक कधी पर्यंत सुरळीत होईल याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.