नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई – आग्रा महामार्गावर आज सायंकाळी पिक व्हॅनच्या धडकेत ७ ते ८ शाळकरी मुले जखमी झाले. याच सुमारास ओझर विमानतळ येथून मालेगावकडे जात असताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना या अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसेच जखमींच्या मदतीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या. तसेच या अपघातामुळे संतप्त नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.