चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यु
नाशिक – सातपूरला एबीबी कंपनीसमोर मागील सोमवारी (ता.३०) चारचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या एकाचा काल मृत्यु झाला. दिनेश माणिक धोरण (वय ३६, शिवाजीनगर सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजेश गोविंद मुदगल (वय ५१, जाधव कॉलनी) यांच्या तक्रारीवरुन सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी ३० आॅगस्टला एबीबी कंपनीसमोर साडे बाराच्या सुमारास भरधाव चाललेल्या छोटा हत्ती ( एमएच १२ क्यु व्ही ५८१) च्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दिनेशला धडक देउन जखमी करुन वाहनचालक तसाच पळून गेला. त्यात, उपचार सुरु असतांना काल शनिवारी (ता.४) त्याचा मृत्यू झाला.
घरफोडीच्या संशयावरुन सराईताला अटक
नाशिक – पंचवटी पोलिसांनी मध्यरात्री घरफोडीच्या संशयावरुन मध्यरात्री फिरणाऱ्या एकाला अटक केली आहे. निलेश अशोक सोनवणे उर्फ खंडवा (वय ३१, पेठ रोड पंचवटी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी पंचवटी पोलिस ठाण्याचे पथक शनिवारी रात्री गस् घातत असतांना पंचवटीतील गणेशवाडी भागात मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास संशयित निलेश सोनवणे हा भाजीमार्केट परिसरात घरफोडीच्या तयारीत असल्याचे दिसले पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही पंचवटी, सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.