नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात त्र्यबकरोडवरील पिंपळगाव बहुला भागात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सौरभ मोतिराम मुळाणे (रा. पिंप्री माळेगाव ता.त्र्यंबकेश्वर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुळाणे बुधवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास नाशिक कडून पिंप्रीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
त्र्यंबकरोडने तो पिंपळगाव बहुला शिवारातून जात असतांना भाऊसाहेब भावले यांच्या घर परिसरात पाठीमागून भरधाव येणा-या एनएल ०१ एएल ८८०६ या कंटेनरने दुचाकीस धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. चुलते बहिरू मुळाणे यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.