इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे जिल्ह्यातील जेजुरी – मोरगाव रस्त्यावर स्विप्ट कार व पीकअप टेम्पोच्या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमारात हा अपघात झाला.
जेजुरी – मोरगाव रस्त्यावर श्रीराम ढाब्यासमोर हा अपघात झाला. स्विप्ट कार एमएच ४२ एएक्स १०६० जेजुरीकडून मोरगावकडे जात होती. यावेळी ढाब्या जवळ उभ्या असलेल्या पीकअप टेम्पो एमएच १२ एक्सएम ३६९४ ला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात स्विप्ट कारमधील पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या अपघातात सात पुरुष आणि एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मुलांसह इतर चार जण जखमी झाले आहेत. जेजुरी पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अपघाताचे कारण आणि अज्ञात मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
या अपघातातील मृत्यू झालेले व्यक्ती हे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहे.