जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोलापूर धुळे महामार्गावर महाकाळमध्ये आयशर ट्रकला बीडकडून छ. संभाजीनगरकडे जाणा-या स्कॅार्पिओ कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबिातील चौघेजण जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारा ही घटना घडली.
या घटनेनंतर जालन्यातील गोंदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमी झालेल्यांना छ. संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.