मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केरळमध्ये एका भीषण अपघातात ५ वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला या विद्यार्थ्यांच्या कारची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला.
केरळच्या अलाप्पुझा येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात मृत्यू पडलेले पाचही जण हे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी होते.
या कारमध्ये सात जण प्रवास करत होते. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.