नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील गरवारे पॉईट येथील उड्डाणपूलावर झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुषण रमेश गांगुर्डे (३० रा.कसबे वणी ता. दिंडोरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई आवेज शेख यांनी फिर्याद दिली आहे. गांगुर्डे रविवारी (दि.१) रात्री महामार्गावरील उड्डाणपूलावरून आपल्या दुचाकीवर एमएच ०५ सीझेड १२१४ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
गरवारे हाऊस समोरील उड्डाणपूलावर तो प्रवास करीत असतांना मुंबईकडून भरधाव येणा-या इनोव्हा एमएच ०५ एझेड ०९०९ या कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गांगुर्डेचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस दप्तरी मोहम्मद साईम मोहम्मद सादिक मोमीन (रा.नुरबाग जवळ,मालेगाव) या कार चालाका विरोधात गुन्ह्याची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.