लखनऊ (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. कासगंजच्या कसबा मोहनपुरा गावात काही महिला माती खोदण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान अचानक मातीचा ढिगारा कोसळून अनेक महिला त्याखाली गाडल्या गेल्या. या अपघातात एका मुलीसह तीन महिलांचा चिरडून मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे दोन डझन महिला चिखलाखाली गाडल्या गेल्याची भीती आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
कासगंज जिल्हा अधिकारी मेधा रूपम आणि पोलिस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक घटनास्थळी उपस्थित आहेत. दोन्ही अधिकारी मदत आणि बचाव कार्याची पाहणी करत आहेत. या अपघातात एका मुलीसह तीन महिलांचा चिरडून मृत्यू झाला. सुमारे दोन डझन महिला अजूनही मातीखाली गाडल्या गेल्याची भीती आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव पथक हजर आहे. जेसीबीने माती काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे. घराचे प्लास्टर करण्यासाठी माती खोदण्यासाठी गेलेल्या महिला मातीत गाडल्या गेल्या. माती काढण्यासाठी गेलेल्या जखमी महिला हेमलता या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितले, की आज देवठाणच्या सणाच्या दिवशी कातोर रामपूरच्या महिलांसह सर्वजण घर सारवण्यासाठी पिवळी माती खोदण्यासाठी गेले होते. त्यानंतर अचानक मातीचा ढिगारा खाली पडल्याने भीषण अपघात झाला. त्यात महिला आणि लहान मुले गाडली गेली.
कासगंज दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवून मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले.